तालखेडला शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी : पाच जखमी, परस्पर विरोधी गुन्हा
Two groups clash over farm dispute at Talkhed: Five injured, mutual crime मुक्ताईनगर : तालुक्यातील तालखेड येथे शेतीच्या वादातून धांडे व पाटील परीवारात वाद निर्माण होवून त्याचे रुपातंर हाणामारीत झाले. हाणामारीत दोन्ही परीवारातील पाच जण किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पहिल्या गटाच्या तक्रारीनुसार चौघांविरोधात गुन्हा
पहिल्या गटातर्फे गोकुळ गजानन धांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या वडिलांनी संशयितांवर केस केल्याचा राग मनात धरून फिर्यादीस लोखंडी रॉड तसेच चापटांनी मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवार, 23 रोजी सायंकाळी साडेसात वाजता संशयितांच्या घरासमोर घडली. या प्रकरणी काशीनाथ त्र्यंबक पाटील, मंगेश काशीनाथ पाटील, गणेश काशीनाथ पाटील, प्रशांत काशीनाथ पाटील (सर्व रा.तालखेडा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसर्या गटाची तक्रार : चौघे जखमी
दुसर्या गटातर्फे नंदाबाई काशीनाथ पाटील (50, तालखेडा) यांनी फिर्याद दिली. संशयितांनी शेतीच्या वादातून घरावर दगडफेक करीत तुमचा मुडदा पाडू, अशी धमकी दिली तर संशयितांच्या मारहाणीत त्र्यंबक किसन पाटील (85), मंगेश काशीनाथ ढेंगे, गणेश काशीनाथ ढेंगे, प्रशांत काशीनाथ ढेंगे (सर्व रा.तालखेडा) हे जखमी झाले असून त्यांच्यावर कुर्हा आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. हाणामारीत नंदाबाई यांचे मंगळसूत्र व गहूपोत असा 75 हजारांचा ऐवज गहाळ झाला तर नंतर पाच ग्रॅमचे मंगळसूत्र सापडले. या प्रकरणी संशयित गजानन श्रीराम धांडे, पवन गजानन धांडे, गोकुळ गजानन धांडे, सुनील श्रीराम धांडे, मयूर सुनील धांडे, अजय विजय धांडे, गजू निना धांडे, पवन राजू धांडे, विजय निना धांडे, जयेश सुनील धांडे, संजय निना धांडे, लताबाई गजानन धांडे, नंदा विजय धांडे, कामिनाबाई निना धांडे (तालखेडा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक विनोद सोनवणे करीत आहेत.
