रंगात आलेल्या जुगारावर सावदा पोलिसांची छापेमारी : 36 हजारांच्या 11 जुगारी कारवाईत कोठडीत
Raid on a gambling den near Big Waghoda : 35,000 worth of valuables seized सावदा : येथून जवळच असलेल्या वाघोदा बुद्रुक गावाजवळ रंगात आलेला जुगाराचा डाव पोलिसांनी उधळत 11 जुगारींना ताब्यात घेत 35 हजार 700 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. शनिवारी दुपारी तीन वाजता छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.
या संशयितांविरोधात कारवाई
या प्रकरणी धनराज राजेंद्र पाटील, अनवर उर्फ फिराज सरवर पटेल, साबीर सिकंदर पटेल, विनोद काशीनाथ कोळी, सुभाष मुरलीधर पाटील, अरविंद उर्फ दीपक रमेश पाटील, सुभाष धोंडू चौधरी, शाहरूख सिकंदर पटेल, उमेश पंडीत कोळी, अनिल रसुल पटेल (सर्व रा.वाघोदा बुद्रुक, ता.रावेर), काशीनाथ घावा, कोरोशिया (रा.मेहतर कॉलनी, सावदा) अश्या 11 जणांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांच्याविरोधात कॉन्स्टेबल विनोद दामोदर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विजय पोहेकर करीत आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पांडूरंग सपकाळे, हवालदार विजय पोहेकर, हवालदार संजीव चौधरी, नाईक अक्षय हिरोळे, पोलीस नाईक यशवंत टहाकळे, कॉन्स्टेबल विनोद दामोदर आदींनी केली.
