भुसावळात महिलेच्या विनयभंगानंतर सामानाची तोडफोड ; विष्णू पथरोडसह चौघांविरोधात गुन्हा


Vandalism of property after molestation of woman in Bhusawal ; Crime against four including Vishnu Pathroad भुसावळ : पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयितांनी शहरातील भारत नगरातील रहिवासी महिलेच्या घरातील सामानाची तोडफोड करीत तिचा विनयभंग केला तसेच महिलेला ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी विष्णू पथरोडसह चौघांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
45 वर्षीय पीडीत महिलेच्या तक्रारीनुसार, शनिवार, 27 रोजी रात्री सव्वा दहा वाजता शुक्रवारी झालेल्या भांडणाच्या वादातून संशयित विष्णू पथरोड, किसन पथरोड (दोन्ही रा.वाल्मीक नगर, भुसावळ) व जावेद तडवी हर्षल पाटील (दोन्ही रा.भारत नगर, भुसावळ) यांनी महिलेच्या घरात अनधिकृतरीत्या प्रवेश करीत सामानाची तोडफोड केली तसेच संशयित हर्षलने महिलेच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले तर अन्य आरोपींनी शिविगाळ करीत महिलेला ठार मारण्याची धमकी दिली. पीडीतेच्या तक्रारीवरून रात्री शहर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, निरीक्षक गजानन पडघण व शहर पोलिसांनी घटनेनंतर धाव घेत माहिती जाणून घेतली. तपास सहाय्यक निरीक्षक निलेश गायकवाड करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !