यावल शहरातील विवाहितेचा विनयभंग : आरोपीला अटक


molestation of married woman in Yaval city : Accused arrestedof married woman in Yaval city : Accused arrested

यावल : यावल शहरातील एका भागात राहणारी विवाहिता घराच्या ओट्यावर झोपलेली असताना संशयिताने साडी ओढून विनयभंग केला. ही घटना रविवारी रात्री साडेदहा वाजता घडली. या प्रकरणी अंकुश गोविंदा कोळी (यावल) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली.

महिला झोपल्यानंतर विनयभंग
यावल शहरातील एका भागातील विवाहिता रविवारी रात्री घराच्या ओसरीत खाटेवर झोपली असता रात्री 10.30 वाजेच्या सुमारास संशयित अंकुश गोविंदा कोळी महिलेच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य करून विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेला आरडा-ओरड केल्याने संशयिताने पळ काढला. याबाबत महिलेने यावल पोलीस ठाण्यात अंकुश कोळीविरूद्ध फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयिताला अटक केली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !