ऑनलाईन ट्रेडींगच्या नावाखाली रावेरच्या तरुणाची फसवणूक : गुजरातमधील आरोपीला अटक

जळगाव सायबर पोलिसांची कारवाई : पाच लाख रुपयांची रोकड जप्त


Raver youth cheated in the name of online trading: Accused arrested in Gujarat जळगाव : रावेर तालुक्यातील तरुणाची ऑनलाईन ट्रेंडींगमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली नऊ लाख 30 हजारांची फसवणूक झाली होती. जळगाव सायबर सेलने या गुन्ह्याचा पर्दाफाश करीत गुजरात राज्यातील भावनगर येथून रविवारी संशयिताला अटक केली. विजय उर्फ अजय दयाभाई कलसरीया (33, अम्रेली, भावनगर, गुजरात) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्याकडून गुन्ह्यातील पाच लाख रुपये, एटीएम व मोबाईल जप्त करण्यात आला.

नफ्याच्या आमिषाने केली फसवणूक
रावेर तालुक्यातील एकाची ऑनलाईन ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल नऊ लाख 30 हजारांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर सेललने फिर्यादीचे व्हॉटसअ‍ॅप आणि बँकेतील झालेले व्यवहारच्या मदतीने संशयित आरोपी हा गुजरात राज्यातील भावनगर येथील असल्याचे निष्पन्न केले. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी सायबर पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, हवालदार प्रवीण वाघ, दिलीप चिचोले, गौरव पाटील यांच्या पथकाला रवाना केल्यानंतर रविवारी संशयित आरोपी विजय उर्फ अजय दयाभाई कलसरीया (33) यास अटक केली. तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !