मध्यप्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही सिखो कमाओ योजनेला द्यावी मंजुरी : शिशिर जावळे यांची शिंदे सरकारकडे मागणी
Like Madhya Pradesh, the Sikh Kamao scheme should be approved in Maharashtra too: Shishir Jawle’s demand to the Shinde government भुसावळ : मध्यप्रदेशातील मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान सरकारने मध्यप्रदेशामध्ये मुख्यमंत्री सिखो कमाओ योजनेस नुकतीच मंत्री मंडळात मंजुरी दिली असून असे अभियान महाराष्ट्रातही राबवावे, अशी मागणी भुसावळातील शिशिर जावळे यांनी केली आहे.
राज्यातही राबवावे अभियान
राज्यातील युवकांना रोजगार मिळवण्यासाठी पात्र बनविणे हा या अभियानाचा उद्देश असून योजनेंतर्गत राज्यातील 18 ते 29 वर्ष वयोगटातील बेरोजगार युवकांना स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग देण्यात येणार आहे. ट्रेनिंगच्या दरम्यान युवकांना स्टायपेंड मिळेल शिवाय युवकांना नोकरीची संधी प्लेसमेंट सुद्धा उपलब्ध होईल. या योजनेंतर्गत जे युवक बारावी पास आहेत त्यांना प्रति महिना आठ हजार, जे आयटीआय उत्तीर्ण आहेत त्यांना आठ हजार 500 रुपये महिना, जे युवक डिप्लोमा पास आहेत त्यांना नऊ हजार रुपये महिना आणि यापेक्षा उच्च शिक्षित, पदवी धारकांना 10 हजार रुपये महिला स्टायपेंड मिळेल. मध्यप्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रातील 18 ते 40 वयोगटातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना बेरोजगार भत्ता त्वरीरत सुरू करावा, अशा मागणीवजा विनंती सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना केली आहे.
