वरखेडे बुद्रुक येथे वीज चोरी करतांना दोघांना पकडले : कारवाईने उडाली खळबळ


 

वीज चोरी होत असताना भरारी पथक धडकले ः दोघांविरोधात अखेर कारवाई

यावल : बोदवड तालुक्यातील एणगाव कक्ष अंतर्गत राज्य विद्युत वितरण कंपनीकडून वरखेडे बुद्रुक गावात वीज चोरी विरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. यामध्ये दोन जण वीज चोरी करतांना आढळले. संबंधितांना वीज युनिटनुसार दंडाची नोटीस देण्यात आली मात्र त्यांनी दंड अदा न केल्याने त्यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अखेर पोलिसात गुन्हा दाखल
बोदवड विद्युत वितरण उपविभाग अंतर्गत एणगाव कक्षाचे अभियंता राहुल शिवाजी चौधरी यांनी वरखेडे बुद्रुक या गावात वीज चोरी विरुद्ध धडक मोहिम राबवली. यात सखाराम प्रभाकर कदम व रावजी निनू चौधरी हे दोघे वी चोरी करताना आढळला. संबंधिताना चोरी केलेल्या वीज युनिटनुसार दोघांना दंड संदर्भात नोटीस बजावण्यात आली. दोघांनी दंड न भरल्याने त्यांच्याविरूध्द यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.


कॉपी करू नका.