विद्यार्थ्यांनो ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची : उद्याच लागणार दहावी परीक्षेचा निकाल
Students this news is very important for you: 10th exam result will be released tomorrow पुणे : दहावी परीक्षेच्या निकालाबाबत सोशल मिडीयातून अनेक तारखा जाहीर करण्यात आल्या मात्र राज्य शिक्षण मंडळानेच दहावी निकालाची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. शुक्रवार, 2 जून रोजी दुपारी एक वाजेनंतर बोर्डाच्या संकेत स्थळावर निकाल जाहीर होणार आहे. याबाबतची माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. मार्च 2023 परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना विषय निहाय मिळालेले गुण या संकेतस्थळांवरुन पाहता येतील तसेच गुणांची प्रिंट आउट घेता येईल.
राज्यातील पाच हजार 33 केंद्रावर परीक्षा
राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थी बसले होते. त्यात 8 लाख 44 हजार 116 मुले आणि 7 हजार 33 हजार 067 मुलींचा समावेश होता. राज्यभरातील 5 हजार 33 केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.




या संकेत स्थळावर पाहता येणार निकाल
www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in