दिड महिन्यांपूर्वीच विवाह ; सासरवाडीला आल्यानंतर पत्नीसोबत शेतात फिरत असतानाच गुंडांनी केली हत्या
Married half a month ago ; After coming to the in-laws, the gangsters killed him while he was walking in the fields with his wife पुणे : अवघ्या दिड महिन्यांपूर्वी विवाह होवून सासरवाडीला आलेल्या जावई पत्नीसोबत शेतात गेला मात्र त्याचवेळी चौघांनी अचानक येत हल्ला चढवत जावयाची निर्घृण हत्या केली. पिंपरी चिंचवड शहराजवळील मावळ तालुक्यात गहुंजे येथे ही घटना घडली. सुरज काळभोर (28) असे मृत तरुणाचे नाव आहे. खुनाचे कारण अस्पष्ट असून पोलिसांनी चारही बाजूंनी तपासाला वेग दिला आहे.
कोयत्याचे वार करीत हत्या
काळभोर येथे गहुंजे येथील संतोष बोडके यांच्या मुलीशी दीड महिन्यापूर्वी सुरजचा थाटात विवाह झाला. सुरज हा आकुर्डी स्टार हॉस्पिटल मागे आईसह वास्तव्यास होता व पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नोकरीला रविवारी तो गहुंजे येथील सासुरवाडीत आला होता. त्यावेळी शेतात फिरत असताना अज्ञात तीन ते चार जणांनी अचानक त्याच्यावर कोयत्याने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर हल्लेखोर पळून गेले.





