मावळमधील खुनाची अखेर उकल : पत्नीच निघाली मारेकरी ; असा उघडकीस आला गुन्हा
The murder in Maval is finally solved: the wife turns out to be the killer ; Such a crime was revealed पिंपरी : पत्नीसोबत सासरवाडीला आलेल्या जावयाची निर्घृण हत्या झाल्याने पुण्याच्या मावळ परीसरात खळबळ उडाली होती. पत्नीने चौघांनी पतीची कोयत्याने हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी पत्नीची सखोल चौकशी केल्यानंतर पत्नीनेच आपल्या पतीची हत्या केल्याची कबुली दिली. पती त्रास देत असल्याने त्यातून हे पाऊल उचलल्याचे पत्नीचा दावा आहे तर पोलीस मात्र पत्नीची आणखीन सखोल चौकशी करीत आहे. सूरज काळभोर या तरुणाच्या खून प्रकरणी त्याची पत्नी अंकिता सुरज काळभोर हिला अटक करण्यात आली.
कोयत्याचे वार करीत हत्या
गहुंजे येथील संतोष बोडके यांच्या मुलीशी दीड महिन्यापूर्वी सुरजचा थाटात विवाह झाला होता. सुरज हा आकुर्डी स्टार हॉस्पिटलमागे आईसह वास्तव्यास होता व पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नोकरीला होता. रविवारी तो गहुंजे येथील सासुरवाडीत आल्यानंतर पत्नी अंकितासोबत शेतात फिरत असताना अज्ञात तीन ते चार जणांनी अचानक त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला व त्याचा मृत्यू ओढवला, अशी माहिती अंकिताने पोलिसांना व गावकर्यांना दिली होती. पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी केल्यानंतर अंकितावरच संशय बळावल्याने चौकशीअंती तिने गुन्ह्याची कबुली दिली.





छळ असह्य झाल्याने खुनाची कबुली
सुरज काळभोर शारीरीक व मानसिक छळ करीत होता व त्यास कंटाळल्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे अंकिताचा दावा आहे. रविवारी सकाळी अंकिताने पतीला माहेरी गहुंजेला आणले व सोबत घरातील चाकूही आणला. शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर दुपारी गहूंजेतील घरी जायच्या आधी तेथीलचं शेतात पोहचले. तिथं पोहचल्यावर अंकिताने लघुशंकेला जायचा बहाणा करीत पतीचे लक्ष नसताना त्याच्यावर चाकूने हल्ला करीत आधी गळा चिरला व नंतर जमिनीवर ढकलले तर त्यानंतर शेतातील टिकाव आणि दगड डोक्यात घातला. यात पतीचा मृत्यू झाला.
