कोर्‍हाळा येथे दुचाकी पेटवली : दोघांविरोधात गुन्हा


Two-wheeler set on fire in Korhala : Crime against two मुक्ताईनगर : तालुक्यातील कोर्‍हाळा येथे लहान मुलांच्या भांडणानंतर तक्रारदाराच्या पत्नीला संशयितांनी शिविगाळ केली व त्या रागातून 60 हजार रुपये किंमतीची दुचाकी जाळण्यात आली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधाल गुन्हा दाखल
संजय सुखदेव कांडेलकर (45) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित दीपक मोहन भोलाणकर व उमेश उत्तम कांडेलकर यांनी शुक्रवार, 2 जूनच्या मध्यरात्री 12 ते 3 च्या वाजेच्या दरम्यान फिर्यादी संजय कांडेलकर यांच्या मालकीची दुचाकी (एम.एच.19 डी.एच.6993) ही फिर्यादीचे काका अनंता कांडेलकर यांच्या घरासमोरून ओढून आणल्यानंतर मुकुंदा न्हावकर यांच्या नवीन बांधकाम घरात नेत ज्वलनशील पदार्थ टाकून गाडी पेटवून दिली. या घटनेत 60 हजारांचे नुकसान झाले. पुढील तपास हवालदार श्रावण जवरे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !