दुचाकी अपघातात भुसावळातील तरुण ठार


Bhusawal youth killed in two-wheeler accident यावल : यावल तालुक्यातील साकळी गावाजवळ दुचाकीद्वारे येत असतांना दुचाकीसमोर अचानक मोकाट जनावर आल्याने दुचाकीचा अपघात घडल्याने 25 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला होता. उपचार सुरू असतांना या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. साकळी, ता.यावल या गावाजवळ डिगंबर संजय चौधरी (25, रा.पंढरीनाथ नगर, जामनेर रोड, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.

उपचार सुरू असताना मृत्यू
डिगंबर चौधरी हा तरुण दुचाकी (क्रमांक एम.एच. 19 डी. क्यू. 1802) द्वारे चोपड्या कडून यावलकडे भरधाव वेगात येत असताना वाहनासमोर अचानक मोकाट जनावर आल्याने दुचाकीचा अपघात घडला. यात हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले व तेथून जळगाव येथे खाजगी रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर उपचार सुरू असताना तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात संजय चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !