पाण्याचा अंदाज न आल्याने एकाचवेळी चौघांचा शेततळ्यात मृत्यू
जालना : शेततळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने एकाचवेळी चौघांचा मृत्यू झाला. सामनगाव (ता.जालना) येथे ही घटना घडली. भागवत कृष्णा पडूळ (वय-10), ओमकार कृष्णा पडूळ (08), युवराज भागवत इंगळे (09) आणि भागवत जगन्नाथ इंगळे (38 सर्व रा. सामनगाव ता. जालना) अशी मयतांची नावे आहेत.
बुडणार्यांना वाचवणार्याचा मृत्यू
जालना शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर सामनगाव हे गाव आहे. या गावातील कृष्णा पडूळ यांचे गावच्या शिवारात शेत आहे. त्यांच्या शेतात भागवत जगन्नाथ इंगळे हे सालगडी म्हणून काम करतात. भागवत इंगळे हे नेहमीप्रमाणे मंगळवारी शेतात कामाला गेले होते. सोबत त्यांचा मुलगा युवराजही होता. दुपारच्या सुमारास भागवत पडूळ, ओमकार पडूळ, युवराज इंगळे हे तीन मुलं शेतातील शेततळ्यावर गेली. शेततळ्यातील पाण्यात पोहण्यासाठी ते उतरले मात्र पोहता येत नसताना बुडू लागल्याने भागवत इंगळे यांनी शेततळ्याकडे धाव घेतली मात्र त्यांचाही मृत्यू झाला.





