भुसावळातील रीपाइं युवा जिल्हाध्यक्ष गिरीश तायडे यांच्यावर प्राणघातक हल्ला


Assault on Girish Taide, youth district president of Ripa in Bhusawal भुसावळ : तालुक्यातील खडका गावातील रहिवासी व रीपाइं युवा जिल्हाध्यक्ष गिरीश देविदास तायडे यांच्यावर अज्ञाताने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. हल्लेखोरांनी गळ्यावर तसेच पोटावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार करीत पळ काढला. अत्यवस्थ अवस्थेत तायडे यांना शहरातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असलेतरी पूर्व वैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचा अंदाज आहे.

पोलिसांची धाव
गिरीश तायडे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती कळताच पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, भुसावळ तालुका पोलीस निरीक्षक विलास शेंडे, सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखडे व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा तायडे यांची पोलीस अधिकार्‍यांनी भेट घेत संशयितांची नावे जाणून घेतली. दरम्यान, गिरीश तायडे हे खडका सरपंच यशोधरा देविदास तायडे यांचे पूत्र आहे. पूर्व वैमनस्यातून हा हल्ल झाल्याचा अंदाज आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !