चिंता झाली दूर : अखेर मान्सुनचे केरळात आगमन ; महाराष्ट्रात कधी ? जाणून घ्या


Worry Gone : Monsoon has finally arrived in Kerala ; When in Maharashtra? find out मुंबई : सात दिवस उशिराने का होईना मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याने चिंता मिटली आहे. नैऋत्य मोसमी पावसाने केरळमध्ये गुरुवारी प्रवेश केला आहे. मान्सूनची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र आणि मध्य अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागात सुरू आहे. केरळ, दक्षिण तामिळनाडू, कोमोरिन भाग, मन्नारचे आखातात मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन 16 जून रोजी होण्याचा अंदाज आहे.

बिपरजॉय वादळाने अडवला होता मार्ग
अरबी समुद्रातील बिपरजॉय वादळाने मान्सूनचा मार्ग अडवला होता. त्यानंतर जूनच्या दुसर्‍या आठवड्याच्या अखेरीस मान्सून दाखल होईल, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले होते. पण बिपरजॉय आता पाकिस्तानच्या दिशेने निघाल्याने मान्सूनचा केरळमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला. बुधवारी केरळ आणि लक्षद्वीपमध्ये जोरदार पाऊस झाला. बंगालच्या उपसागरावर मान्सूनच्या ढगांचा दाट थर जमा झाला आहे त्यामुळे येत्या 24 तासांत मान्सूनची पूर्व रेषा ईशान्येकडील राज्यांमध्ये पोहोचू शकते.





राजधानीत उष्णतेची लाट
राजधानी दिल्लीत पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही. मात्र, कमाल तापमानात हळूहळू वाढ होत राहील. हवामान केंद्र सफदरजंग येथे बुधवारी किमान तापमान 25.2 अंश सेल्सिअस, सामान्यपेक्षा दोन अंशांनी कमी आणि कमाल 38.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा दोन अंशांनी कमी आहे.

महाराष्ट्रात 16 जून रोजी आगमन
गेल्या 12 वर्षांचा अभ्यास केला असता केवळ एका वर्षीचं मान्सून महाराष्ट्रात 7 जूनच्या दरम्यान दाखल झाला होता. मान्सूनचा गेल्या 12 वर्षातील प्रवास पाहिला असता महाराष्ट्रात मृग नक्षत्राला मान्सून दाखल होता तर यंदा 16 जून रोजी महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !