20 हजारांची लाच भोवली : ग्रामविकास अधिकार्‍यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात


₹20,000 bribe proves costly : Three, including a Gram Vikas Adhikari, nabbed by the ACB राहुरी, जि.अहमदनगर (1 जुलै 2026) : घरकुल अनुदानाचा हप्ता मंजूर करण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती 20 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना राहुरी तालुक्यातील सात्रळ ग्रामविकास अधिकारी हैदर याकूब पटेल (56, वृंदावन कॉलनी, श्रीरामपूर रोड, राहुरी फॅक्टरी, ता.राहुरी), कंत्राटी लिपिक ज्ञानदेव मोहन डुकरे (43, सात्रळ, ता.राहुरी) व कंत्राटी गृहनिर्माण अभियंता सचिन हौशीराम ब्राह्मणे (समात नगर, वेताळ चौक, लोणी, ता.राहता) यांना एसीबीने अटक केली.

असे आहे लाच प्रकरण
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला होता. संबंधित प्रकरणात पहिला हप्ता 15 हजार रुपये व दुसरा हप्ता 70 हजार रुपये मिळाल्यानंतर पुढील हप्ता मिळवून देण्यासाठी तसेच 70 हजार रुपयांचे अनुदान मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात 20 हजारांची लाच आरोपींनी मागितल्यानंतर अहिल्यानगर एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली व सापळा रचून आरोपींना मंगळवारी सायंकाळी पकडण्यात आले.



आरोपींविरोधात राहुरी पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 (सुधारित 2018) मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलीस निरीक्षक सविता तांबे, पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, चंद्रकांत काळे, किशोर कुळधर, शेखर वाघ, चालक दशरथ लाड आदींच्या पथकाने यशस्वी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !