यावल शहरात भाजपाचा बुथ सशक्तीकरण अभियान मेळावा
पक्ष संघटन वाढवण्याकरीता प्रत्येकाने पुढाकार घ्यावा : खासदार रक्षा खडसे
यावल : केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोक कल्याणकारी योजना नागरीकांपर्यंत पोहोचवा तसेच पक्ष संघटन वाढवण्याकरीता प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन खासदार रक्षा खडसे यांनी केले. यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिर सभागृहात भाजपाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता, शक्ती केंद्रप्रमुख व बुथप्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होत्या. मेळाव्यात पक्षांच्या वतीने विकसीत करण्यात आलेल्या विविध अॅप्सबाबत माहितीदेखील देण्यात आली.
कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन
यावल तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुथ सशक्तीकरण अभियान व केंद्रातील भाजपाच्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कार्यकर्ता, शक्ती केंद्रप्रमुख व बुथप्रमुख यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. शहरातील श्री महर्षी व्यास मंदिर सभागृहात या मेळाव्याला उत्साहात सुरवात झाली. या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना खासदार रक्षा खडसे यांच्या सह मान्यवरांनी मार्गदर्शन केले. केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोक कल्याणकारी योजना नागरीकांपर्यंत पोहचवा तसेच पक्ष संघटन वाढवण्याकरीता प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन खासदार रक्षा खडसे यांनी केले.
यांची मेळाव्यास उपस्थिती
या मेळाव्यात शक्ती केंद्रप्रमुख व बुथप्रमुख यांनी आपाापल्या कामकाजाचा ऑनलाईन कोणत्या अॅप्सच्या माध्यमातून अहवाल सादर करायचा आहे याची माहिती दिली. पक्षांच्या वतीने विकसीत करण्यात आलेल्या विविध एप्सच्या बाबत माहितीदेखील देण्यात आली. या मेळाव्यात खासदार रक्षा खडसे सह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, शरद महाजन, बाजार समिती सभापती हर्षल पाटील, डॉ. कुंदन फेगडे, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, गणेश नेहेते, विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, भरत महाजन, मीना तडवी, सागर कोळी, जयश्री नरेंद्र चौधरी, निलेश गडे, अनंता नेहेते, रीतेश बारीसह मोठया संख्येत पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आभार विलास चौधरी यांनी मानले.
बाजार समिती सभापती, संचालकांचा सत्कार
या मेळाव्यात नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विजयी झालेल्या सर्व संचालक व सभापतींसह पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला व बाजार समितीच्या माध्यमातून शेतकर्यांची प्रश्न सोडवावे, अशा सुचना पदाधिकार्यांना करण्यात आल्या.
