भुसावळसह बोदवड, रावेरात नागरीकत्व सुधारणा कायद्याला विरोध


भुसावळ : नागरीकत्व सुधारणा कायद्याविरोधात भुसावळसह बोदवड व रावेरात शुक्रवारी मुस्लीम समाजातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी
सी.ए.ए. व एन.आर.सी. व एन.पी.ए.कायदा रद्द करण्यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

भुसावळातील धरणे आंदोलनात महिलांचा सक्रिय सहभाग
भुसावळ-
शहरातील डी.एस.ग्राऊंडवर झालेल्या धरणे आंदोलनात मुस्लीम समाजातील महिलांचा लक्षणीय सहभाग राहिला. याप्रसंगी माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सी.ए.ए. व एन.आर.सी. व एन.पी.ए.कायद्याच्या निषेधार्थ डोक्याला काळी पट्टी बांधण्यात आली तसेच निषेधाचे विविध फलकही झळकावण्यात आले. प्रसंगी संविधान बचावो समितीतर्फे तहसील प्रशासनाला राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देण्यात आले.

बोदवडला नायब तहसीलदारांना निवेदन
बोदवड- तहसील कार्यालयासमोर शुक्रवार, 17 रोजी सी.ए.ए. तसेच एन.पी.ए.कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांसह विविध सामाजिक संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार दीपक कुसकर यांच्या माध्यमातून राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, पी.आर.पी.नेते जगन सोनवणे, मौलवी आमीन, मौलवी इस्तयाक, युनूस परवे, मुनाफ ठेकेदार, हाजी सईद बागवान, सलामोद्दीन, इरफान शेख, हसन ठेकेदार, साजीद परवे, साबीर पटवे, बशीर कंडक्टर, इजहार शेख, हाफीज फिरोज, अरमान कुरेशी, मोलवी, गुलाम हैदर, तस्लीम मण्यार, संगीता भामरे, ईश्वर जंगले, दीपक झांबड, धनराज जैस्वाल, नगरसेवक देवेंद्र खेवलकर, विनोद पाडर, डॉ.उध्दव पाटील, डॉ.सुधीर पाटील, विनोद मायकर, आनंदा पाटील, विजय पालवे यांचेसह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते,व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

रावेरातही धरणे आंदोलन
रावेर- तहसील कार्यलयाजवळ मुस्लिम समाजातर्फे एसीसी व एनआरसी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयाजवळ मुस्लिम समाजातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. एसीसी व एनआरसी कायदा रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी शेख गयास, यूसुफ खान, आसीफ मेंबर, सादीक नबी, असद खान, रफीक अजीज, शेख कालू शेख नूरा, सैय्यद आशिफ, फिरोज खान, शेख इरफान, असगर खान, समद अजीज यांच्यासह हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !