भुसावळात चाकूच्या धाकावर दहशत : ईराणी आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात


Terror at knife point in Bhusawal : Iranian accused in market police net भुसावळ : कमरेला चाकू लावून दहशत निर्माण करणार्‍या संशयिताच्या बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडील तीनशे रुपये किंमतीचा धारदार चाकू जप्त करण्यात आला आहे. हसन अली उर्फ आशू नियाज अली इराणी (20, पापानगर, ईराणी मोहल्ला, भुसावळ) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

बाजारपेठ पोलिसांची कारवाई
खडका रोड, रजा टॉवर भागात संशयित चाकूच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर संशयिताला गुरुवारी दुपारी पाऊण वाजता अटक करण्यात आली. कॉन्स्टेबल शिवाजी श्रीकृष्ण पाटील यांच्या फिर्यादीनुसार संशयिताला अटक करण्यात आली. तपास हवालदार रमण सुरळकर करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !