अनैतिक संबंधातून पत्नीचा खून करणार्‍या आरोपीने कारागृहातच घेतला गळफास


The accused who killed his wife due to immoral relationship hanged himself in the jail नागपूर : नागपूर कारागृहातून खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. अनैतिक संबंध ठेवणार्‍या पत्नीचा खून केल्यानंतर शिक्षा भोगणार्‍या आरोपी पतीने गळफास घेतला आहे. हा प्रकार शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास उघडकीस आला. श्यामराव ऋषीजी शेंडे (वय 40, मुडझा, जि.गडचिरोली) असे गळफास घेतलेल्या कैद्याचे नाव आहे.

अनैतिक संबंध ठेवणार्‍या पत्नीची केली हत्या
शेतकरी असलेल्या श्यामराव शेंडे हा पत्नीला मारहाण करीत असल्याने पत्नी माहेरी निघून गेली होती अर्थात या मागे अनैतिक संबंध तोडावेत हे प्रमुख कारण होते. पत्नी 12 वर्ष माहेरी राहिल्यानंतर तिला गेल्या दोन वर्षांपूर्वी त्याने पुन्हा आपल्या घरी आणले मात्र पत्नीने आपल्या वागणुकीत सुधारणा न करता अनैतिक संंबंध कायम ठेवल्याने 2020 मध्ये कुर्‍हाडीने वार करून आरोपी शेतकर्‍याने पत्नीचा खून केला होता.






नैराश्यातून घेतला गळफास
गेल्या दोन वर्षांपासून तो चंद्रपूर कारागृहात होता. त्याला 13 एप्रिल रोजी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. महिन्याभरापूर्वी त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले मात्र नैराश्याच्या गर्तेतील आरोपीने शनिवारी सकाळी अकरा वाजता कारागृहाच्या रंगकाम करण्याच्या भिंतीच्या खिडकीला पायजामाच्या नाड्याने गळफास घेतला. धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !