यावलच्या खिर्णीपूरा भागातील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ : सावद्यातील पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा
यावल : शहरातील खिर्णीपुरा भागातील माहेर असलेल्या एका 21 वर्षीय विवाहितेचा माहेरूहून एक लाख रूपये आणावे यासाठी पतीसह सहा जणांनी छळ केला. पैसे न आसणल्याने विवाहितेला माहेरी सोडून देण्यात आले. या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सहा संशयितांविरोधात गुन्हा
यावल शहरातील खिर्णीपुरा भागातील माहेर असलेल्या सना इरम शाहरुख खान (21) या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह नोव्हेंबर 2021 मध्ये शाहरुख खान सैफुल्ला खान (रा.चांदणी चौक, सावदा) यांच्यासोबत झाला होता. विवाहानंतर पतीच्या अंडरगारमेंटच्या होलसेल व्यवसाया करीता विवाहितेने माहेरहून एक लाख रुपये आणावे म्हणून पती शाहरुख खान सैफुल्ला खान, सासरे सैफुल्ला खान मनवर खान, सासू रहिमाबी सैफुल्ला खान, इमरान खान सैफुल्ला खान, फिरदोसबी सैफुल्ला खान व रुकसाना बी सैफुल्ला खान या सहा जणांनी तिचा छळ केला व तिला शारीरिक आणी मानसिक त्रास दिला व मारहाण केली. विवाहितने पैसे आणले नाही म्हणून तिला माहेरी सोडून देण्यात आले. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध विवाहितेच्या छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संजय देवरे करीत आहे.
