पाडळसा शेत-शिवारातून केबल वायर चोरी : पाडळसा गावातील संशयित जाळ्यात
Theft of cable wire from Padalsa farm: Suspects in Padalsa village यावल : तालुक्यातील पाडळसा शेत शिवारात एकाने केबल वायर चोरी करून नेली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर शेतकर्यांने संशयीताविरूध्द फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. फैजपूर पोलिसांनी संशयीताला अटक केली आहे.
चार हजारांची वायर लांबवली
पाडळसा, ता.यावल येथील यशवंत पुरुषोत्तम बर्हाटे यांच्या मालकीचे शेत गट क्रमांक 364 मध्ये त्यांनी शेतविहिरीत केबल लावली होती. शेतविहिरीत जवळ येऊन पवन सोनाजी मालखेडे-कुंभार (चिनावल, हल्ली मुक्काम पाडळसा) हा आला व त्याने चार हजार रुपये किंमतीची पंचवीस फूट लांबीची तांब्याची केबल वायर कापून चोरी केली. हा प्रकार शेतकर्याच्या निदर्शनास आल्यानंतर संशयीताविरूध्द फैजपूर पोलीस ठाण्यात यशवंत बर्हाटे यांनी फिर्याद दिली. तपास पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विकास सोनवणे करीत आहे.
