चुंचाळे शिवारात पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन चोरत दुसर्‍या शेतात लपवली : एकाविरोधात गुन्हा


Stealing a water supply pipe line in Chunchale Shiwar and hiding it in another field : Crime against one यावल : तालुक्यातील चुंचाळे शेत शिवारात शेतामध्ये पिकाला पाणीपुरवठा साठी गाळलेले पाईप चक्क अज्ञात चोरट्याने चोरी करण्याच्या उद्देशाने खोदून काढले व शेतातुन काढून दुसर्‍या शेतात केळीत लपवले. हा प्रकार शनिवारी उघडकीस आला. 24 पाईप चोरीच्या उद्देशाने अज्ञाताने शेतातून लांबवले म्हणून अज्ञाताविरूध्द यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
चुंचाळे, ता.यावल येथील अजय अरुण पाटील यांनी यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या चुंचाळे शेत-शिवारातील शेत गट क्रमांक 119/1 मध्ये त्यांनी केळी लावली व केळीला पाणी भरण्यासाठी त्यांनी पाईपलाईन केलेली आहे. शनिवारी सकाळी ते शेतात गेले असता त्यांना शेतात खोदून गाढलेले 20 फुट लांबीचे 24 नग प्लास्टिक पाईप हे कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या शेतातून खोदून चोरी केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी सर्वत्र शोध घेतला असता त्यांच्या शेतातुन चोरी केलेले पाईप हे जवळच असलेल्या धनराज भीमराव मराठे यांच्या शेताच्या केळीच्या बागेत आढळले. अज्ञात चोरट्याने चोरीच्या उद्देशाने त्यांच्या शेतातून हे पाईप खोदून काढून केळीत लपवलेले दिसून आले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !