थोरगव्हाणला 35 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
यावल : यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथे एका 35 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात संतापाच्या भरात गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी दुपारी निदर्शनास आला. यावल पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर मृतदेह यावल रुग्णालयात आणण्यात आला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
संतापात लावला गळफास
थोरगव्हाण, ता.यावल येथील रहिवासी वसंत जानकीराम पाटील (35) यांनी संतापात आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार सोमवारी दुपारी निदर्शनास आल्यानंतर कुटुंबीयांनी यावल पोलिसांना माहिती दिली व घटनास्थळी पोलिसांनी येवून मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात हलवला. डॉक्टरांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांस सोपवला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आत्माराम बाबुराव पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.
