धावत्या रेल्वेतून पडल्याने बिहारातील प्रवाशाचा मृत्यू
रावेर : कुठल्यातरी धावत्या रेल्वेतून पडल्याने बिहारातील 23 वर्षीय तरुण प्रवाशाचा मृत्यू झाला. चंदन कुमार माखन (23, माखन, भोज, मुजफ्फरपूर, बिहार) असे मयत प्रवाशाचे नाव आहे.
मयत बिहार राज्यातील रहिवासी
रविवार, 11 जून रोजी चंदन कुमार हा कुठल्यातरी धावत्या रेल्वेतून पडल्याने जखमी झाला होता. वाघोड स्टेशन मास्तर राजीवकुमार कमलप्रसाद वर्मा (45) यांनी जखमी अवस्थेत प्रवाशाला रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू ओढवला. तपास हवालदार राजेंद्र राठोड करीत आहेत.





