रावेरात वाळू माफियांची दादागिरी : प्रशिक्षणार्थी तहसीलदारांना जेसीबीद्वारे चिरडण्याचा प्रयत्न

रावेर तालुक्यातील भोकर नदीपात्रातील घटना : 12 संशयितांविरोधात गुन्हा दाखल


Bullying by sand mafia in Ravera: Attempt to crush trainee tehsildars by JCB रावेर : भोकर नदीपात्रातून अवैध वाळूचे उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी तहसीलदारांना चिरडण्यासाठी अंगावर वाळू माफियांनी जेसीबी मशीन घालण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील पातोंडी शिवारच्या भोकर नदीपात्रात रविवारी रात्री घडली. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. प्रशिक्षणार्थी तहसीलदार मयूर कळसे यांनी रावेर पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर वाळू माफियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात वाळू माफियांचा हैदोस सुरू असताना पोलीस व महसूल यंत्रणा बोटचेपी भूमिका घेत असल्याने सुज्ञ नागरीक संतप्त झाले आहेत.

सतर्कतेमुळे तहसीलदार बचावले
प्रशिक्षणार्थी तहसीलदार मयूर कळसे यांच्या तक्रारीनुसार, रविवार, 11 जून रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास मंडळाधिकारी जनार्दन भंगाळे, यासीन तडवी, विठोबा पाटील, गजेंद्र शेलकर, कोतवाल प्रवीण धनके आदींच्या पथकासह पातोंडी शिवारात भोकर नदीपात्रात गेल्यानंतर अवैध गौण खनिजाचा उपसा व वाहतूक करणारा जेसीबी (एम.एच.19 डी.व्ही.3739) तसेच एक निळ्या रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.19 ए 1311) ट्रॉलीसह व एक स्वराज कंपनीचे निळ्या रंगाचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर अवैधरीत्या वाळू वाहतूक करीत असताना कारवाईसाठी पथक गेल्यानंतर मोहन बोरसे याने जेसीबी सुरू केला. संबंधितास जेसीबी मशीन तहसील कार्यालयात आणण्यास सांगितल्यानंतर संशयिताने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जेसीबी जोरात अंगावर आणला मात्र सतर्कतेने बाजूला झाल्याने कळसे बचावले तर संशयित मशीन घेऊन पसार झाला तर ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.19 ए. 1311) ट्रॉलीसह घेवून अनोळखी इसम ट्रॅक्टर घेऊन पूनखेड्याच्या दिशेने पसार झाला तर मनोज दशरथ बोरसे याने वाळूचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर खिरवड गावाच्या दिशेने घेऊन पळ काढला. विठोबा पाटील यांनी अडवण्याचा प्रयत्न मात्र संशयित कट मारून पसार झाला. या प्रकरणी मोहन बोरसे, मनोज बोरसे (दोन्ही रा.पातोंडी) व त्यांच्यासोबतचे 8 ते 9 इतर व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विशाल सोनवणे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !