बक्षीपूर गावातून चोरट्यांनी दुचाकी लांबवली
The thieves stole the bike from Bakshipur village रावेर : तालुक्यातील बक्षीपूर येथून चोरट्यांनी 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
संदीप किसन महाजन (36, बक्षीपूर, ता.रावेर) यांच्या तक्रारीनुसार, 18 ते 19 मे दरम्यान चोरट्यांनी त्यांची 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.15 सी.एन.4784) ही घराबाहेरून लांबवली. या प्रकरणी रावेर पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सतीश सानप करीत आहेत.
