भुसावळात गांजा ओढणारे पोलिसांच्या रडारवर : दोघांवर कारवाई
Ganja smokers in Bhusawal on police radar : Action against two भुसावळ : शहरातील जुन्या नगरपालिका परीसरात गांजा ओढणार्या शेख फिरोज शेख अकिल गवळी (27, अंजूमन शाळेजवळ, भुसावळ) व मोहसीन मेहबूब शेख (36, खडका रोड, लक्ष्मी बेकरीजवळ, भुसावळ) यांना बाजारपेठ पोलिसांनी रविवारी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास ताब्यात घेत त्याच्याविरोधात एनडीपीएस अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केल्याने नशेगोरांमध्ये घबराट पसरली आहे.
सार्वजनिक ठिकाणी नशा करणार्यांमध्ये खळबळ
शहरात सार्वजनिक जागेवर धुम्रपान करून गांजा ओढणार्यांविरोधात पोलिसांकडून धडक कारवाईचा सपाटा सुरू आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल योगेश महादू भील व कॉन्स्टेबल अतुल श्रावण कुमावत यांच्या फिर्यादीवरून दोघा संशयितांविरोधात बाजारपेठ पोलिसात एनडीपीएस अॅक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नेरकर करीत आहेत.
