भुसावळ पालिकेच्या सफाई कामगाराची दुचाकी लांबवली
Bhusawal Municipality cleaner’s bike extended भुसावळ : भुसावळ पालिकेतील सफाई कामगाराची घराबाहेर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना झेडटीएस भागातील स्नेह नगरात सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
घराबाहेरून लांबवली दुचाकी
कन्हैय्या भागीरथ जावळे (43, स्नेह नगर, फेकरी शिवार, भुसावळ) हे भुसावळ पालिकेत सफाई कामगार असून झेडटीएस भागातील स्नेहनगरात वास्तव्यास आहेत. कामावर येण्या-जाण्यासाठी त्यांच्याकडे दुचाकी (एम.एच.19 सी.टी.0687) असून 11 जूनच्या रात्री 11 ते 12 जूनच्या पहाटे साडेसहा दरम्यान चोरट्यांनी घराबाहेर 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी न आढळल्याने जावळे यांनी तालुका पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय शामकुमार मोरे करीत आहेत.
