भुसावळात औषध विक्रेत्याला मारहाण करीत साहित्याचे नुकसान : दोघांविरोधात गुन्हा


Damage to material by beating drug seller in Bhusawal: Crime against both भुसावळ : मेडिकल दुकानदाराने कोल्ड्रींक्स व पाणी बॉटलचे पैसे मागितल्याच्या वादातून दोघांनी शिविगाळ करीत साहित्याचे नुकसान केले. ही घटना शहरातील गडकरी नगरातील न्यू मोनू मेडिकलमध्ये सोमवारी दुपारी दिड वाजता घडली. या प्रकरणी संशयित सोमेश जावेद टावरे व रणजीत (पूर्ण नाव माहित नाही, गडकरी नगर) यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पैसे मागितल्याने केली मारहाण
शेख जावेद शेख वकील (32, दत्त नगर, खडका रोड, भुसावळ) यांचे गडकरी नगरात मेडिकल दुकान आहे. सोमवारी दुपारी दिड वाजता दोन्ही संशयित दुकानात आले व त्यांनी कोल्ड्रींक्स व पाणी बॉटल मागितल्यानंतर त्याबाबत पैसे मागितल्याने त्याचा राग येवून संशयितांनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत शिविगाळ केलीे व साहित्याची नासधूस केली. तपास समाधान गणेश पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !