चुंचाळे शेत शिवारातून पाईप लांबवली : चुंचाळेतील आरोपीला अटक


Chunchale farm extended pipe from Shiwar: Accused arrested in Chunchale यावल : यावल तालुक्यातील चुंचाळे शेत-शिवारातून पाईप चोरी करणार्‍यास यावल पोलिसांनी अटक केली. संशयिताकडून पाईपदेखील हस्तगत करण्यात आले आहे. संशयिताला यावल न्यायालयात हजर केले असता त्यास बुधवारपर्यंत एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. हे पाईप शेतातून खोदून काढून चोरी करण्यात आले.

आरोपीला सात पर्यंत पोलीस
चुंचाळे, ता.यावल येथील अजय अरुण पाटील यांच्या चुंचाळे शेत शिवारातील शेत गट क्रमांक 119/1 मधून केळीला पाणी भरण्यासाठी केलेल्या पाईप लाईनचे पाईप खोदून काढत चोरी झाले होते. शेतात गाढलेले 20 फूट लांबीचे 24 नग प्लास्टिक पाईप चोरी प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल होता. या प्रकरणी यावल पोलिसांनी संशयीत म्हणून धनंजय भीमराव मराठे (चुंचाळे) यास अटक केली. त्याच्याकडून 21 नग पाईपदेखील हस्तगत करण्यात आले. संशयितास यावल येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्या.एस.बी.वाळके यांच्यासमोर हजर केले असता मराठे यास 7 जुनपर्यंत एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार असलम खान करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !