भरधाव डंपरच्या धडकेत जळगावातील दाम्पत्य ठार
लग्नाला जाताना गाठले काळाने : महामार्गावर अपघातांची मालिका कायम
जळगाव : महामार्गावर अपघातांची मालिका कायम असून लग्नाला जाणार्या दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव टँकरने धडक दिल्याने पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी दोन वाजता शहरातील पोद्दार इंग्लिश मेडियमसमोर घडली. महेंद्र गोपालदास आहुजा (48, रा.गायत्री नगर शिरसोलीरोड) व भावना महेंद्र आहुजा (45) अशी मयतांची नावे आहेत.
लग्नाला जाताना गाठले मृत्यू
जळगावातील फुले मार्केटमध्ये महेंद्र आहुजा यांचे गोपाल जनरल स्टोअर्स नामक दुकान असून शनिवारी पाळधी येथे एका ग्राहकांच्या नातवाईकांचा विवाह समारंभ असल्याने आहुजा दाम्पत्य या लग्नाला जाण्यासाठी पाळधीकडे दुचाकीने निघाले असताना पाठीमागून आलेल्या टँकरने जोरधार धडक दिल्याने दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. मृत महेंद्र आहुजा यांच्या पश्चात चार भाऊ, चार बहिणी, दोन मुली, एक मुलगा असा परीवार आहे.



