मुक्ताईनगरात भीषण अपघात ; अमरावतीतील विवाहिता जागीच ठार, चालक गंभीर जखमी


Fetal accident in Muktainagar ; Amravati married woman killed on the spot, driver seriously injured मुक्ताईनगर : भरधाव वॅगनआरने स्वीप्टला धडक दिल्याने झालेल्या अपघातात अमरावती जिल्ह्यातील 40 वर्षीय विवाहिता ठार झाली तर चालक जखमी झाल्याची घटना कर्की फाट्याजवळ सोमवारी सकाळी 10.30 वाजता घडली. या प्रकरणी वॅगनआरवरील चालकाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघातात आरती घनश्यामसिंग सेंगर (40, धारणी, ता.अमरावती) ही विवाहिता ठार झाली.

वाहन चालकाविरोधात गुन्हा
स्वीप्ट चालक संकेत गणेश बोरसे (26, निरोळ, ता.संग्रामपूर) यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, वॅगन आर (एम.एच.39 डी.व्ही.7331) वरील चालकाने भरधाव वेगाने आपले वाहन चालक स्वीप्ट (एम.एच.04 एच.एफ.4488) ला समोरून भरधाव वेगाने धडक दिल्याने अपघात घडला व त्यात वॅगन आरमधील महिला आरती सेंगर या ठार झाल्या तर वॅगन आर चालकही जखमी झाला. हवालदार संतोष चौधरी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !