पाच हजारांची लाच भोवली : दुकाने निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात


5000 bribe: shop inspector in ACB’s net नाशिक : हॉटेलमध्ये बालकामगार असल्याबाबत गुन्हा दाखल न करण्यासाठी पाच हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या नाशिकमधील दुकान निरीक्षक निशा बाळासाहेब आढाव (53) यास नाशिक एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली.

उपायुक्त कार्यालयात स्वीकारली लाच
40 वर्षीय तक्रारदार हे हॉटेल व्यावसायीक असून त्यांचे नाशिकमध्ये हॉटेल आहे. मंगळवार, 13 रोजी आरोपी आढाव यांनी हॉटेलमध्ये बालकामगार नोकरीस असल्याची बतावणी करून त्याबद्दल केलेल्या तपासणीचा अहवाल निरंक पाठवण्यासाठी पाच हजारांची मागितली होती व त्याबाबत एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली व गुरुवारी कामगार उपायुक्त कार्यालयात लाच स्वीकारताच संशयिताला अटक करण्यात आली.






यांनी केला सापळा यशस्वी
पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर, मनोज पाटील, अजय गरुड, शीतल सूर्यवंशी आदींनी हा सापळा यशस्वी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !