पतीच्या निधनानंतर प्रेम जुळले मात्र प्रियकराने प्रेयसीच्या मुलींवरच केला अत्याचार


पुणे : प्रेमात बुडालेल्या प्रेमविरांच्या अनेक घटना समाजापुढे येतात त्यात काही घटना धक्कादायकदेखील असतात. पुण्यातूनही असाच प्रकार समोर आला आहे. पतीचे निधन झाल्यानंतर एका महिलेचे एकाशी सूत जुळले मात्र नराधम प्रियकराने महिलेच्या दोन अल्पवयीन मुलींना शिकार केल्याचे तपासात समोर आला आहे. सामाजिक संस्थेतील समुपदेशनात अत्याचाराला वाचा फुटताच आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला.

असे आहे नेमके प्रकरण
संशयित आरोपी पर्वती भागातील जनता वसाहतीत राहायला असून त्याचे एका महिलेशी सूत जुळले व या महिलेच्या पतीचे निधन झाल्याने ती 12 व 9 वर्षांच्या मुलीसोबत वास्तव्याला होती मात्र या मुली प्रियकराला पप्पा असे म्हणत होत्या. दोन वर्षांपूर्वी महिलेचे प्रियकरासोबत वाद झाल्याने महिला घराबाहेर पडताच आरोपीने 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. मुलीला एका सामाजिक संस्थेत पाठविण्यात आले. सामाजिक संस्थेत तिची चौकशी, तसेच समुपदेशन करण्यात आले. तेव्हा आईच्या प्रियकराने अत्याचार केल्याची माहिती मुलीने दिली. त्यानंतर या स्वयंसेवक महिलेने छोट्या मुलीकडे चौकशी केली तेव्हा तिनेही प्रियकराने अत्याचार करण्यात आल्याचे सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक काळे तपास करत आहेत.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !