नववीच्या विद्यार्थ्याकडील पिस्टल प्रकरण : संशयिताचा ताबा पालकांकडेच


भुसावळ : शहराजवळील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता नववीच्या विद्यार्थ्याकडे पिस्टल आढळले होते. केवळ हौस म्हणून या विद्यार्थ्याने बिहारमध्ये गेल्यानंतर मामाच्या शेजारी राहणार्‍या रहिवाशाच्या घरातून पिस्टल आणले मात्र या घटनेने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली होती. शाळा प्रशासनाच्या तक्रारीवरून विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ यांनी विद्यार्थ्याची दिवसभर चौकशी केल्यानंतर या विद्यार्थ्याचा ताबा पालकांकडे दिला आहे.

बालनिरीक्षण गृहात होणार समूपदेशन
या विद्यार्थ्याला लवकरच समुपदेशानासाठी बालनिरीक्षण गृहात पाठवण्यात येणार असून या विद्यार्थ्याचे पालक हे भुसावळ रेल्वेत कर्मचारी असल्याची माहिती आहे. दरम्यान, शाळा प्रशासनाने विद्यार्थ्याबाबतचही माहिती मुंबईतील पदाधिकार्‍यांना पत्राद्वारे कळवली असून त्यानंतर विद्यार्थ्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !