रावेर-यावल भाजपा विधानसभा प्रमुख अमोल जावळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव


भालोद  : सातत्याने शेतकर्‍यांचे प्रश्न अभ्यासपूर्ण पध्दतीने मांडणारे, पक्ष संघटना-विचारांसाठी दमदारपणे लढणारे, माजी खासदार तथा आमदार कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे यांचा राजकीय वारसा जपतानाच आपल्या कार्यकतृत्वाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे, उच्चशिक्षित, अभ्यासू, संभाषण चतूर, नम्र, थोरामोठ्यांना सोबत घेवून चालण्याच्या आणि आदर देण्याच्या वृत्तीमुळे सर्वांनाच आपलेसे वाटणारे आणि तेवढेच आक्रमक असलेले रावेर-यावल भाजपा विधानसभा प्रमुख युवा नेतृत्व अमोल हरीभाऊ जावळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात भालोद येथील त्यांच्या निवासस्थानी पार पडला.

विविध पदाधिकार्‍यांची उपस्थिती
भालोद येथील त्यांच्या निवासस्थानी सकाळपासून तर रात्री उशिरापर्यंत अनेक तालुक्यातील सर्व पक्षांचे प्रमुख लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध संघटनाचे पदाधिकारी, विविध विभागातील अधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणावर तरुणांची उपस्थिती पहायला मिळाली. खास करून तरुणांमध्ये मोठ्याप्रमाणावर यावेळी उत्साह बघायला मिळाला.

फोनद्वारेही लोकप्रतिनिधींच्या शुभेच्छा
अल्पावधीतच आपली काम करण्याची आक्रमक शैली आणि सातत्याने सर्व सामान्यांच्या सुख-दुःखात सामील होण्याच्या वृत्तीने मोठ्या प्रमाणावर मित्र परीवाराचा गोतावळा त्यांनी निर्माण केला. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जळगावचे पालक मंत्री गुलाबराव पाटील, विविध पंथांचे संत महंत या व्यतिरिक्त जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी यांनी फोन द्वारे अमोल जावळे यांना शुभेच्छा दिल्यात.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !