अवैध वाळू वाहतूक : ट्रॅक्टर ट्रॉली जप्त
रावेर : अवैध वाळू वाहतूक करणारी ट्रक्टर-ट्रॉली महसुल पथकाने रविवारी पहाटेच्या सुमारास पकडली. या कारवाईमुळे अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास पातोंडी-खिरवड रस्त्यावरुन अवैध वाळुची वाहतूक करीत असतांना विना नंबर असलेले ट्रेक्टर-ट्रॉली नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या टिमने कारवाई केली. या टीम मध्ये मंडळ अधिकारी पी.डी.आडे, सचिन पाटील, शरीफ तडवी, दादाराव कांबळे, निलेश चौधरी, भरत वानखेडे, यासीन तडवी, शैलेश झोटे आदींच्या पथकाने केली.


