A fruit seller was robbed at knifepoint in Amalnerat अमळनेरात चाकूच्या धाकावर फळ विक्रेत्याला लूटले
A fruit seller was robbed at knifepoint in Amalnerat
अमळनेर : बसस्थानक परीसरातील फळ विक्रेत्याला चाकूचा धाक दाखवून गल्ल्यातील तीन हजारांची रोकड लांबवण्यात आली. ही घटना रविवारी रात्री नऊ वाजता घडली. या प्रकरणी संशयितआरोपी कात्या उर्फ गौरव प्रमोद महाले (शिवाजी नगर, शिरूर नाका, अमळनेर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे लुटीचे प्रकरण
फयाज युनूस बागवान (19, शिवशक्ती चौक, अमळनेर) हा तरुण फळ विक्रीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. रविवार, 25 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता अमळनेर बसस्थानकाजवळील त्याच्या दुकानावर फळ विक्री करत असताना संशयित आरोपी कात्या उर्फ गौरव प्रमोद महाले हा आला. त्याने चाकूचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देत तरूणाच्या गल्ल्यातून तीन हजार रुपयांची रोकड लुटून पळ काढला. फयाज बागवान या तरुणाने अमळनेर पोलिसात तक्रार नोंदवल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार बापू साळुंखे करीत आहे.