Chalisgaon city police big operation ; Two in the net with 36 stolen bikes चाळीसगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई : चोरीच्या 36 दुचाकींसह दोघे जाळ्यात


Chalisgaon city police big operation : Two in the net with 36 stolen bikes चाळीसगाव : शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे चोरीसह गहाण ठेवलेल्या तब्बल 36 दुचाकी जप्त केल्या असून दोघा संशयितांना अटक केली आहे. इरफान बेग आरीफ बेग (नगरदेवळा) व संतोष सुधाकर राठोड (55, तळेगाव तांडा, ता.चाळीसगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
तक्रारदार गुलाब नजीर मंसुरी (नगरदेवळा, ता.पाचोरा) यांच्या मालकीची बजाज कंपनीची लाल काळ्या रंगाची डीस्कव्हर मोटरसायकल (एम.एच.19 ए.बी.2484) ही चाळीसगाव शहरातील रेल्वे स्टेशनच्या बाहेरुन चोरीस गेल्यानंतर तपास सुरू असताना कॉन्स्टेबल आशुतोष सोनवणे यांना गुप्त माहिती मिळाली. मन्सुरी यास प्रथम ताब्यात घेतल्यानंतर त्याने दुचाकी राठोडला विकल्याची माहिती दिल्याने त्यासदेखील ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या खोलवर तपासानंतर संतोष सुधाकर राठोड याच्या घराच्या परीसरातून तब्बल 36 दुचाकी जप्त केल्या. त्यातील काही चोरीच्या तर काही गहाण ठेवलेल्या आहेत.

यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सागर ढिकले, पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, नितीश पाटील, राहुल सोनवणे, विनोद भोई, दीपक पाटील, भूषण पाटील, महेंद्र पाटील, विजय पाटील, रवींद्र बच्छे, प्रवीण जाधव, आशुतोष सोनवणे, नंदकिशोर महाजन, राकेश महाजन, पवन पाटील, शरद पाटील, उज्वलकुमार म्हस्के, विनोद खैरनार, अमोल भोसले, निलेश पाटील, प्रकाश पाटील, सबा शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !