सहा हजारांचे लाच प्रकरण : भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील हवालदाराची जामिनावर सुटका
6,000 bribe case: Constable of Bhusawal taluka police station released on bail भुसावळ : शेतकर्यावर इलेक्ट्रीक पंप चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सहा हजारांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील हवालदार गणेश पोपट गव्हाळे (41, रा.होली प्लेस सोसायटी, जामनेर) यांना गुरुवार, 22 जून रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मांडवा फाट्यानजीक पकडण्यात आले होते.

अटकेनंतर संशयिताची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. संशयितार्फे जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर सोमवार, 26 जून न्या.आर.एम.जाधव यांच्या न्यायासनापुढे जामीनावर कामकाज झाले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून 20 हजारांच्या जातमुचलक्यावर संशयिताला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. संशयितातर्फे अॅड.राजेंद्र राय यांनी युक्तीवाद केला.