Marathwada-Khandesh communication will become easier : 3552 crore fund approved for railway route जालना-जळगाव रेल्वे महामार्गासाठी 3552 कोटींचा निधी मंजूर

मराठवाडा-खान्देशातून दळणवळण अधिक होणार सुलभ : रेल्वे मंत्री रावसाहेब दानवेंचा पाठपुरावा


Marathwada-Khandesh communication will become easier : 3552 crore fund approved for railway route भुसावळ : भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत जालना-जळगाव रेल्वे मार्गाचा ‘फायनल लोकेशन सर्वे’ फेब्रुवारी महिन्यात मंजूर करण्यात आल्यानंतर आता या मार्गाच्या कामासाठी तीन हजार 552 रुपये कोटींच्या निधीला मान्यता दिली आहे. मरावाड्यातून खान्देशला जोडण्यात येणार्‍या जालना-जळगाव या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठीच्या खर्चास राज्य सरकारच्या बुधवारी मंत्री ंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. भविष्यात हा मार्ग पूर्णत्वास आल्यानंतर मराठवाडा व खान्देशातील दळण-वळण अधिक सुलभ होणार असून पर्यटकांसह भाविकांची मोठी सोय होणा आहे. या मार्गामुळे औद्योगिक विकासासह, व्यापार, दळणवळण, शेती, लघुउद्योग आणि पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

174 किलोमीटर लांबीचा मार्ग
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना-जळगाव नवीन रेल्वेमार्गाची घोषणा केल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात जालना-जळगाव रेल्वेमार्गाचा अंतिम सर्व्हे तयार करण्यात आला होता. जालना ते जळगाव हा 174 किलोमीटर लांबीचा मार्ग असणार आहे.या मार्गावर जगप्रसिद्ध अजिंठा लेणीचेठिकाण आणि मराठवाड्याचे आराध्य दैवत राजूरचा गणपती हेदेखील रेल्वेशी जोडले जाणार आहे. जालना- जळगाव रेल्वेमार्गामुळं मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील औद्योगिक विकासासह, शेती, व्यापार, दळणवळण, व्होकल फॉर लोकल, लघुउद्योग, पर्यटनाच्या विकासाला चालना मिळणार आहे. जालना वरुन पिंपळगाव, पांगरी, राजूर, भोकरदन, सिल्लोड मार्गे गोळेगाव, अजिंठा, फर्दापुर, जळगाव जाणारा 70 टक्के रेल्वेमार्ग जालना लोकसभा क्षेत्रातून जात आहे आणि याचा फायदा पुढे सूरत, गुजरात, राजस्थानच्या गाड्यांना आंध्राप्रदेश, दक्षिण भारताकडे जाण्यासाठी छोटा मार्ग म्हणून होणार आहे.

पर्यटकांची होणार मोठी सोय
अजिंठा हे ऐतिहासिक शिल्पकलेचे पर्यटन स्थळ असल्याने जालना-खान्देश या रेल्वे मार्गामुळे येथे जगभरातील पर्यटकांसाठी रेल्वे प्रवासाची सोय देखील होणार आहे. मराठवाड्याचे आराध्य दैवत राजूर महागणपती येथून हा रेल्वे मार्ग जात असल्याने या भागातील भाविकांसाठी सोयीचे ठरणार आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !