भडगावनजीक डंपर-पिकअपमध्ये अपघात : तरुण जागीच ठार


Rushing dumper blows up pick-up: Pimpalgaon youth killed भडगाव : राष्ट्रीय महामार्गावरील पासर्डी गावाजवळ भरधाव डंपरने पिकअप वाहनाला दिलेल्या जबर धडकेत पिकअप वाहनाचा क्लीनर जागीच ठार झाला तर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान
राष्ट्रीय महामार्गावरील पसर्डी गावाच्या पुढे बालाजी टी सेंटरच्या समोर डंपरने (क्रमांक एम.एच.15 एच.एच. 9658) ने भाजीपाला वाहतूक करणार्‍या पिकअप वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानंतर पिकअप गाडीचा क्लीनर सारंग श्रीधर माळी (35, पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा) हा जागीच ठार झाला तर हायवा डंपर चालक व क्लिनर सोमनाथ अशोक सोनवणे (रा. सिन्नर) हे जखमी झाले. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. याबाबत शांताराम रामदास करवंद (25, रा.भोजे, ता.पाचोरा) यांच्या फिर्यादीवरून डंपर चालक सुनील संपत घुगे (रा.सिन्नर जि. नासिक) याच्या विरोधात भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार छबुलाला नागरे हे करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !