चाळीसगाव तालुक्यात भीषण अपघात : पित्याचा मृत्यू, सुदैवाने मुलगा बचावला


Fatal accident in Chalisgaon taluk: Father dies, fortunately son survives चाळीसगाव : गौण खनिजाचे डंपर अचानक मागे आल्यानंतर त्याखाली दबून पित्याचा मृत्यू झाला तर सुदैवाने पित्याने मुलाला बाजूला ढकलल्याने मुलगा बचावला. ही घटना चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड परीसरात मंगळवार, 27 रोजी घडली. दादाभाऊ जयसिंग गायगवाड (50, हातले) असे मृत पित्याचे आहे तर सागर गायकवाड (19) असे बचावलेल्या तरुणाचे नाव आहे.

अचानक डंपर मागे आल्याने अपघात
चाळीसगाव ते धुळे मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून पिंपरखेड धरण परीसरातून मुरूम नेला जात आहे. मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या धरण सुमारास पिंपरखेड धरण परीसरातून डंपर (एम.एच.20 ई.जी. 6512) हा उभा असताना या डंपरच्या पाठीमागून दुचाकीने दादाभाऊ गायकवाड हे मासेमारी करून घराकडे जात होते. डंपर चालकाने अचानक डंपर मागे घेतल्याने डंपर मागे असलेल्या गायकवाड यांच्या दुचाकीला जबर धडक बसली. यावेळी दादाभाऊ गायवाड यांनी दुचाकीवरून आपला मुलगा सागर याला बाजूला ढकलल्याने तो बचावला मात्र, दादाभाऊ यांचा मात्र मृत्यू झाला. अपघातांनतर चालकाने डंपर सोडून पळ काढला.

मासेमारीसाठी गेलेल्या कुटूंबावर दुखाःचा डोंगर
चाळीसगाव तालुक्यातील हातले येथील दादाभाऊ गायकवाड हे मुलगा सागरसह मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होते. दादाभाऊ हे नेहमीप्रमाणे मुलगा सागरसह पिंपरखेड धरणात मासे पकडण्यासाठी आले असता घरी परतताना हा भीषण अपघात झाला. डोळ्यादेखत वडीलांचा अपघातात मृत्यु झाल्याने सागरला मोठा धक्का बसला. घटनास्थळी त्याचा आक्रोश मन हेलावणरा होता. गायकवाड यांच्या पश्चात पत्नी व दोन मुल असा परीवार आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात डंपर चालकाविरोधात मुलगा सागर याच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !