जामनेर तालुक्यातील अल्पवयीन तरुणीवर अत्याचार : तरुणाला अटक


Abuse of minor girl in Jamner taluka : Youth arrested जामनेर : जामनेर तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय मुलीवर एका महिलेच्या घरात नेवून वारंवार अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयित महिला ज्योती ज्ञानेश्वर चौधरी व सोनू बाळू पडोळ (रा.जामनेर तालुका) यांच्याविरोधात गुन्हा जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बदनामीची धमकी देत अत्याचार
14 वर्षीय अल्पवयीन तरुणी जामनेर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून संशयित सोनू पडोळ याने मुलीच्या अल्पवयीन पणाचा फायदा घेत बदनामी करण्याच्या धमकीने तसेच तिच्या आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत ज्योती चौधरी हिच्या घरी नेत तिच्यावर अत्याचार केला. जानेवारी 2023 मध्ये दोन वेळा व एप्रिल 2023 मध्ये एक वेळा अत्याचार करण्यात आल्याचे पीडीतेने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पोस्कोन्वये गुन्हा दाखल केला असून संशयित सोनू बाळू पडोळ यास अटक केली आहे. तपास पोलीस उपअधीक्षक धनंजय येरूळे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !