पीएम किसान योजनेचे तत्काळ मार्गी लावा -संजय तायडे
रावेर : रावेर महसूल विभागाची महत्वपूर्ण आढावा बैठक नुकतीच होवून त्यात दिलेले उद्दिष्ट वेळीच पूर्ण करावे, शेतकरी बांधवांच्या पीएम किसान योजनेचे काम तत्काळ करण्याच्या सूचना नायब तहसीलदार संजय तायडे यांनी उपस्थित तलाठ्याां दिल्या. रावेर तहसील कार्यालयात महसूल विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. त्यात महसूल वसूली शंभर टक्के करावी, अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा घालावा, शेतकरी बांधवांच्या पीएम किसान योजनेसंदर्भात येणार्या त्रृटी तत्काळ दुरुस्त करून त्यांच्या समस्या सोडवा या सह अनेक महसूलच्या विविध विषया संदर्भात नायब तहसीदार संजय तायडे यांनी बैठकीला उपस्थित तलाठी मंडळ अधिकारी यांना सूचना दिल्या. यावेळी नायब ततहसीलदार सी.जी.पवारदेखील उपस्थित होते.


