Many office bearers of Shiv Sena in Bhusawal join BJP भुसावळातील शिवसेनेच्या अनेक पदाधिकार्‍यांचा भाजपात प्रवेश


Many office bearers of Shiv Sena in Bhusawal join BJP  भुसावळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, माजी पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, तालुका प्रसिद्धीप्रमुख गोकुळ बाविस्कर, दिव्यांग सेनेचे माजी तालुकाप्रमुख फिरोज तडवी, युवा सेनेचे तालुका समन्वयक सुरेंद्र सोनवणे, बुथ प्रमुख प्रशांत बागले, ललित नेहेते, कैलास पाटील, विकास सपकाळे, प्रा.सीमा पाटील, सरला सपकाळे, पल्लवी पाटील तसेच अयोध्या नगरातील ज्येष्ठ नागरीक भगवान ठाकरे, लक्ष्मीकांत इंगळे, रघुनाथ पाटील, धनसिंग बोरणारे, गोवर्धन सावकारे, सुधाकर कोळी, मनोहर वराडे, दशरथ माळी, मधुकर बेंडाळे, नरेंद्र नेमाडे यांनी भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सोमवारी भाजपामध्ये प्रवेश केला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
गुरु पौर्णिमेच्या दिवशी हा प्रवेश सोहळा आमदार सावकारे यांच्या कार्यालयात झाला. यावेळी आमदार संजय सावकारे, समाजसेवक प्रमोद सावकारे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेविका अनिता सपकाळे, समाजसेवक सतीश सपकाळे, समाजसेवक अजय नागराणी, बापू महाजन, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, उपाध्यक्ष अमोल पाटील उपस्थित होते.

शिवसेनेचे अभ्यासू नेतृत्व भाजपात
गेल्या नऊ वर्षांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाला चालना दिली. भुसावळ तालुक्यात विकासपर्व घेऊन आमदार संजय सावकारे यांनी निरंतर कार्य सुरू ठेवल्याने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोमवारी भाजपात प्रवेश केला. भविष्यात पक्ष विस्तार व संघटन वाढीवर भर देणार असल्याचे प्रा.पाटील यांनी सांगितले. नवीन पीढीचा भाजपावर विश्वास दृढ झाला आहे. राजकारणापेक्षा विकासावर अधिक भर दिला जातोय म्हणूनच अनेक ज्येष्ठांसह तरुणांनी आज भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे. यापुढेही पक्षात अनेक कार्यकर्ते जुळणार असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !