Ravindra Nana Patil जळगाव युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील पक्षातून बडतर्फ


District President of Jalgaon Youth Nationalist Party Ravindra Nana Patil dismissed from the party
जळगाव :
जळगाव युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांना पक्षाने बडतर्फ केले असून त्याबाबतचे पत्र जारी करण्यात आले आहे. अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पाटील यांनी भुसावळात फटाके फोडून जल्लोष केला होता तसेच त्यांना उघडपणे समर्थने दिल्याने पक्षातर्फे ही कारवाई करण्यात आली. राष्ट्रवादी युवकचे प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांनी याबाबतचे पत्र जारी केले असून बीड, नाशिक, सोलापूर युवक जिल्हाध्यक्षांसह सरचिटणीस, प्रदेश सचिव व युवक प्रदेश उपाध्यक्षांवरही बडतर्फीची कारवाई करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

उघडपणे दिले होते समर्थन
रवींद्र नाना पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांसह रविवारी दुपारी शपथविधीनंतर भुसावळात जल्लोष केला होता. यानंतर राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयाच्या समोर देखील ते आनंदोत्सव करतांना दिसून आले. यानंतर त्यांनी आपण अजितदादांच्या सोबत जाणार असल्याचे जाहीर देखील केले होते. दरम्यान, आज सायंकाळी युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी एक पत्रक काढून युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील आणि जिल्हा शहर कार्याध्यक्ष सुशीलकुमार शिंदे यांना बडतर्फेकरीत असल्याचे नमूद केले आहे. या पदाधिकार्‍यांनी पक्षाचे नाव, चिन्ह आणि पद वापरू नये, असे करतांना आढळून आल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

आम्ही दादांसोबत : रवींद्र पाटील
आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वात काम करीत आहोत व यापुढेही करीत राहू. बडतर्फ व निलंबन करण्याचा यांचा अधिकार मुळातच नाही, असे बडतर्फीच्या निर्णयावर रवींद्र पाटील म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !