molestation of married woman in Jamner city जामनेर शहरातील विवाहितेचा विनयभंग


molestation of married woman in Jamner city जामनेर : शहरातील एका भागातील 25 वर्षीय विवाहितेशी अश्लील वर्तन करीत तिचा विनयभंग करण्यात आल्याची संतापजनक घटना सोमवारी सकाळी 11 वाजता घडली. या प्रकरणी संशयित विष्णू दल्लू चव्हाण (जामनेर) याच्याविरोधात जामनेर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अश्लील वर्तन करीत विनयभंग
25 वर्षीय विवाहिता परीवारासह एका भागात वास्तव्यास असून याच भागात संशयित विष्णू चव्हाण याने पीडीतेच्या मुलाला घरात आणण्याच्या बहाण्याने घरात दारूच्या नशेत प्रवेश करीत पीडीतेशी अश्लील वर्तन करीत तिचा विनयभंग केला. पीडीतेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रीयाज शेख करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !