बिलवाडी शिवारात विवाहितेचा विनयभंग : दोघांविरोधात गुन्हा
molestation of married couple in Bilwadi Shivar : Crime against both पहूर : किरकोळ वादातून 45 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करून विवाहितेच्या पतीसह मुलाला जीवेठार मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी मंगळवारी पहूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शेतशिवारात केला विनयभंग
जामनेर तालुक्यातील बिलवाडी येथे 45 वर्षीय महिला हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. मंगळवार, 3 जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता महिला ही त्यांच्या शेतात काम करत असताना संशयित आरोपी विश्वास भगतसिंग राजपूत आणि लताबाई विश्वास राजपूत हे महिलेच्या बांधावर आले. महिला शेतात काम करीत असताना यातील संशयित आरोपी विश्वास राजपूत याने महिलेचा हात पकडून अंगलटपणा करून अश्लिल कृत्य करीत विनयभंग केला तर लताबाई परदेशी या महिलेने पीडीत महिलेला मारहाण करून गळ्यातील मंगलपोत तोडून नुकसान केले. हा प्रकार घडल्यानंतर दोघांनी तिच्या पतीला व मुलांना शिविगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार मंगळवार, 4 जुलै रोजी रात्री 8 वाजता पहूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल. तपास सहाय्यक फौजदार शशिकांत पाटील करीत आहे.


